Tamarind for Skin : चवीने आंबट-गोड असणारी चिंच सगळ्यांनाच आवडते. चिंचेपासून विविध प्रकारच्या चटण्या, चिंचेचे पाणी, चिंचेच्या चॉकलेट्स अशा कितीतरी गोष्टी बनवल्या जातात आणि आवडीने खाल्ल्या जातात. चिंचेचा उपयोग स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात केला जातो.
चिंचेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंन्ट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फ्लेव्होनॉइड्सचा समावेश आढळून येतो. चिंच आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचेवरील जळजळ आणि सूज कमी करण्याचे काम चिंच करते. त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी चिंच अतिशय फायदेशीर आहे.
आज आपण त्वचेसाठी फायदेशीर असणाऱ्या चिंचेचा कशाप्रकारे वापर केला जाऊ शकतो ? ते जाणून घेणार आहोत. चला तर मग चिंचेचे चेहऱ्याला होणारे फायदे कोणते आहेत ? ते जाणून घेऊयात.
टॅनिंग काढून टाकण्यासाठी चिंचेचा फेसपॅक
चिंचेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म चेहऱ्याचे टॅनिंग घालवण्यासाठी मदत करतात. सन टॅन काढून टाकण्यासाठी चिंचेचा फॅस पॅक फायदेशीर आहे.
हा फेसपॅक बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
चिंचेचा वाटीभर कोळ पाण्यात भिजवून घ्या.
आता या चिंचेच्या कोळामध्ये समप्रमाणात बेसन मिसळून घ्या.
चिंचेचा कोळ आणि बेसन हे दोन्ही मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करा.
आता या मिश्रणात २-३ थेंब गुलाबजल घाला, तुमचा फेस पॅक तयार आहे.
आता, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.
२०-२५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.
चिंचेचे स्क्रब
आपल्या त्वचेवर मृत त्वचा जमा होते. ही मृत त्वचा काढून टाकण्यासाठी त्वचेला एक्सफोलिएट केले जाते. यासाठी तुम्ही चिंचेपासून स्क्रब तयार करून तुमची त्वचा एक्सफोलिएट करू शकता.
चिंचेचे फेस स्क्रब तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
-
हे स्क्रब तयार करण्यासाठी २ चमचे चिंचेच्या कोळामध्ये समान प्रमाणात समुद्री मीठ मिसळा.
-
आता याची छान पेस्ट तयार करून घ्या.
-
या पेस्टमध्ये १ चमचा दही किंवा दूध मिक्स करा.
-
तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी दहीचा वापर करावा.
-
आता तुमचे फेस स्क्रब तयार आहे.
-
या स्क्रबच्या सहाय्याने तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.
-
१५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.