

By
हल्लीच्या तरुणांमध्ये कोरियन ब्युटी प्रोडक्ट्सची क्रेझ खूप वाढल्याचं दिसत आहे. कोरियन तरुणींचे स्किन केअर टिप्स जगभरातील तरुणी मोठ्या प्रमाणात फॉलो करताहेत. कारण कोरियन तरुणींची त्वचा सुंदर व काचेसारखी चमकदार असते.
यामुळे कोरियन ब्युटी प्रोडक्ट्सची मागणी वाढत आहे. पण कोरियन तरुणी आपल्या ब्युटी केअर रूटीनमध्ये नैसर्गिक उपचाराची मदत घेतात, हे तुम्हाला माहिती आहे का? त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी या तरुणी तांदळाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतात. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती..
शिजवलेल्या तांदळाचे फेस पॅक
सामग्री :
-
शिजवलेले तांदुळ – दोन चमचे
-
कच्चे दूध – दोन चमचे
-
मध – एक चमचा
वरील सर्व सामग्री एका वाटीमध्ये एकत्रित घ्या व पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट चेहरा व मानेवर लावा. १० मिनिटे पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा व मानेचा भाग स्वच्छ करून घ्यावा. हलक्या हाताने नॅपकिनने त्वचा पुसून घ्या व यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे.
-
आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.
-
चेहऱ्यावरील डाग, मुरुम, सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
-
सनबर्न, टॅनिंगची समस्याही दूर होईल.
-
त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येईल.
फेस पॅकचे फायदे
त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी तांदुळ अतिशय लाभदायक मानला जातो. कारण यामध्ये अमिनो अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. तर कच्च्या दुधामध्ये त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.